Advertisement

  स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार एक गंभीर                 

प्रजापत्र | Wednesday, 16/06/2021
बातमी शेअर करा

 

 

 

गेवराई-तालुक्यातील गढीजवळ स्कॉर्पिओने दुचाकीस्वारांना जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यु झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी (दि.१६) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. 

 

     अर्जून महादेव शेंदरे (वय-४० रा.राजंणी) असे मयताचे नाव असून बाबासाहेब नामदेव शिंदे  (वय-३८ रा.शिंदेवाडी) या अपघातात गंभीर जखमी झाले.दुचाकीस्वार गेवराईवरून राजंणीकडे जात असतांना गढी जवळ समोरून येणाऱ्या स्कॉर्पियोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात    अर्जून शेंदरे यांचा मृत्यु झाला असून बाबासाहेब शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान जखमीवर गेवराईच्या उपजिल्हा रूग्णयातून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीडला हलवण्यात आले आहे.दरम्यान आज सकाळी देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे यांचा ही अपघाती मृत्यु झाला होता. 

 

कारच्या धडकेत पुजाऱ्याचा मृत्यु  
धारूर-भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पुजाऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना तेलगाव येथील शिवाजी चौकात मंगळवारी रात्री घडली.
        तेलगाव येथील शिवाजी चौकात असलेल्या हनुमान मंदिरात मारूती किसन साबळे हे पुजारी म्हणुन काम करतात.ते जवळच असलेल्या  भोपा ता.धारूर येथे राहतात. सध्या लाॅकडाऊन असल्याने मंदिर बंद आहे.त्यामुळे मंगळवारी सायंकाळी मारूती साबळे मंदिरात दिवाबत्ती करण्यासाठी आले होते. यावेळी माजलगाव रोडने भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने मारूती साबळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात साबळे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ माजलगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ  दाखल केले.परंतु त्यांना जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रूग्णालयात हलवण्यात आले. माञ येथे उपचार चालु असतानाच त्यांचे निधन झाले. शवविच्छेदन करून भोपा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारूती साबळे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

 

Advertisement

Advertisement