Advertisement

जोर'धार' पावसामुळे येडेश्वरीची साखर भिजली

प्रजापत्र | Sunday, 13/06/2021
बातमी शेअर करा

 

केज-जिल्ह्यात शनिवारी (दि.१३) सायंकाळी झालेल्या जोर'धार' पावसामुळे येडेश्वरी कारखान्याच्या साखरेच्या गोदाममध्ये पाणी शिरून तब्ब्ल ५१ हजार क्विंटलचे साखरेचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी दिली. 

 

               आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याने कारखान्याच्या इतिहासात उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार केला होता.कारखान्याचा ७ वा गळीत हंगाम प्रतिदिनी ३९००  मे टनानी हंगामाच्या पहिल्या दिवसापासुन यशस्वीपणे ऊस गाळप सुरू झाला. हंगामाच्या १७२ व्या दिवशी उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार करून ६ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते.शनिवारी रात्री जोर'धार' पावसामुळे  येडेश्वरीची साखर भिजली असून यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

Advertisement