Advertisement

विवाहितेवर अत्याचार, केज पोलीसात गुन्हा दाखल

प्रजापत्र | Sunday, 30/05/2021
बातमी शेअर करा

केज दि.30 - तालुक्यातील 25 वर्षीय विवाहितेवर नात्यातील चुलत दिराने अत्याचार केल्या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
       

            तालुक्यातील 25 वर्षीय विवाहित महिला घरा सामोरील अंगणात झोपलेली असताना तिला नात्यातील चुलत दिराने दीड महिन्यापूर्वी घराच्या बाजूला ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला व तिला चाकूचा धाक दाखवून हा प्रकार कोणास सांगितला तर तुझी व्हिडिओ शूटिंग नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली. त्यामुळे आपल्या इज्जती पोटी हा प्रकार पिडीतेने पतीला सांगितला नाही. मात्र दिनाक 28 मे रोजी रात्री अकरा वाजता परत पिडीतेवर चुलत दिराने अत्याचार केल्याने तिने हा प्रकार पतीस सांगितला असता त्यास तिच्या पतीने दिनांक 29 मे रोजी सकाळी सात वाजता जाब विचारला असता त्याने त्यास शिवीगाळ करत पिडीतेस पोलीसात गेल्यास पतीची सुपारी देऊन जीव मारण्याची धमकी दिली.

 

                       या प्रकरणी पीडित विवाहितेने केज पोलीसात या बाबत तक्रार दाखल केल्याने आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे करत आहेत.

Advertisement

Advertisement