Advertisement

चिंचोली माळी वरपगाव दरम्यान मृतदेह आढळला

प्रजापत्र | Saturday, 15/05/2021
बातमी शेअर करा

केज दि.15 - तालुक्यातील चिंचोली माळी ते वरपगाव रस्त्यावर (दि.15) उसाच्या शेतात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

             चिंचोली माळी ते वरपगाव दरम्यान गायकवाड वस्तीजवळ वरपगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर गायकवाड यांच्या शेतातील उसाच्या बांधावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सदरील मृतदेहाच्या अंगात लाल रंगाचा चौकडा शर्ट व राखाडी  कलरची नाईट पॅन्ट असून सदरील व्यक्ती कोण आहे याची ओळख पटलेली नाही. 
           घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी भास्कर सावंत, एपीआय संतोष मिसळे, फौजदार श्रीराम काळे, बिट जमादार अमोल गायकवाड, पोना दिलीप गित्ते, नामदास घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करत आहेत.

Advertisement

Advertisement