Advertisement

केज तालुक्यात विजेच्या कडकडाटासह गारपीट, दोन ठिकाणी वीज कोसळली

प्रजापत्र | Saturday, 01/05/2021
बातमी शेअर करा

डी. डी. बनसोडे/केज

 

केज दि.१ -  शनिवारी दुपारी झालेल्या विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्यातील चंदनसावरगावातील एका वस्तीवर विज पडून शेतकऱ्याचे सोयाबीन, हारबरा, गव्हु, मोटारसायकल सह शेतातील पाण्याचे पाईप, कडब्याच्या गंजीसह संपूर्ण निवारा जळून खाक झाला. सुदैवाने जीवित हानी मात्र झाली नाही.

            शनिवारी दुपारी तालुक्यातील चंदनसावरगाव येथील वस्तीवरील तुकाराम साहेबराव तपसे यांच्या शेतातील घरावर अवकाळी पावसात विज पडली. दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला होता. या ठिकाणी असलेल्या पुर्ण वस्तीलाच धोका निर्माण झाला होता मात्र अग्निशमन दलाच्या गाडीमुळे आग आटोक्यात आणली गेली. परंतु तोपर्यंत तुकाराम तपसे या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले होते. तसेच वस्तीवरील लोकही मोठ्या प्रमाणावर आग विझवण्यासाठी धावले होते. अवकाळी पावसामुळे शेतकरी भयभीत झालेले असतानाच पुन्हा चंदनसावरगावात विज पडली व शेतकऱ्याचे मोठ्ठे नुकसान झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच याच गावच्या शिवारात विज पडून एका युवकाचा मृत्यू झाला होता.

                    दरम्यान सदरील घटना ताजी असतानाच याच गावच्या शिवारामधे आणखी विज पडून मोठे नुकसान झाले आहे. नशिब बलवत्तर म्हणून या ठिकाणी जिवीतहानी टळली आहे. मात्र या घटनेमुळे गावातील वातावरण भयभीत झाले आहे. तुकाराम तपसे यांच्या झालेल्या या नुकसानीमुळे कुटुंबाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.तर तालुक्यातील अन्य कांही गावातही मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Advertisement

Advertisement