किल्लेधारुर दि.१(वार्ताहर) शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकळ घालत चार दुकाने फोडत एक दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. शटरचे कान कात्रीच्या सहाय्याने तोडून दुकानात प्रवेश करुन ह्या चोऱ्या केल्या असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे व्यापा-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्याने अशा घटना घडत असल्याचे व्यापारी बोलत आहेत.
किल्लेधारुर शहरात मागील काही काळात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडुन चोरट्यांना धाक बसेल अशी कोणतीच कार्यवाही होत नाही. यामुळे चोरटे येतात आणी चो-या करुन जातात पोलीस पंचनामा करुन आपले काम पुर्ण करतात. तपास मात्र वाऱ्यावर असतो. यामुळे शहरात वारंवार चोरीच्या घटना वाढत आहेत. शहरात शुक्रवारी झालेल्या चोरीच्या घटना यातीलच प्रकार आहे. शहरातील तेलगाव रोड वरती असलेले सोन्याचे प्रविण ज्वेलर्स आणि त्यालाच लागुन असलेले आयुषी मेडीकल, राज मेडीकल व गायकवाड गल्लीतील भगवान किराना दुकाना या दुकानाच्या शेटरचे कान मोठ्या कातरीच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन येथील चिल्लर व नोटा मिळुन नगदी सहा हजार रुपयाची चोरी केली आहे. तर राज मेडीकल येथील नगदी रक्कम चोरी गेली आहे. तर ईतर दुकानात चोरट्यांना नगदी पैसेच मिळाले नाही म्हणून ते रीकाम्या हाताने परतले. तर गायकवाड गल्ली येथील शिवाजी फावडे यांची हीरो होंडा पॕशन प्रो गाडी चोरट्यांनी पळवली आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरट्यांनी चो-या केल्या असल्याने व्यापा-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. मात्र ह्या चोरट्यांचा तपास पोलिस कधी लावणार ? असा प्रश्न व्यापारी करीत आहेत.