Advertisement

 दुचाकी चोरीतील अल्पवयीन आरोपी मोटारसायकल सह जेरबंद

प्रजापत्र | Thursday, 22/04/2021
बातमी शेअर करा

केज दि.२२ - शहरातील उमरी रोड वरील सहयोग नगर भागातून चोरीस गेलेली दुचाकी अल्पवयीन आरोपीसह ताब्यात घेतली असून अवघ्या २४ तासात दुचाकीचा शोध लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

 

               अधिक माहिती अशी की,  केज शहरातील माधव नगर भागातील भगवान किसन सारूक यांची दुचाकी शिक्षक कॉलनीतील नातेवाईकांच्या घरासमोरून चोरून नेल्याची १२ एप्रिल रोजी १० वाजता घडली होती. तर हनुमान गल्लीतील किशोर महादेव कदम या तरुणाची घरासमोर लावलेली दुचाकी १५ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या पूर्वी चोरट्यांनी लंपास केली होती. या घटनेनंतर केज शहर बिट जमादार रुक्मिणी पाचपिंडे यांनी जुबेर उर्फ पापा मुस्ताक शेख ( रा. केज ) यास अटक केली. त्याच्याकडून भगवान सारूक व किशोर कदम या दोघांच्या दुचाकी जप्त केल्या.

 

त्याने कानडी रोडवरील कोगीजपिर भागातील एकजण दुचाकी चोरी करताना सोबत होता अशी माहिती दिली होती. जुबेर शेख हा लातूरच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तर कानडी रोडवरील अल्पवयीन आरोपीच्या शोधात पोलीस असताना त्याने २० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या केज शहरातील उमरी रस्त्यावरील सहयोग नगर भागातील फुलचंद हरिभाऊ सोनवणे यांचा भाऊ विजय सोनवणे यांनी घरापुढे लावलेली दुचाकी ( एम. एच. ४४ एफ १२६३) चोरून नेकनूूूरकडे पळ काढला होता. परंतु सदरील आरोपीने सोनवणे यांची मोटारसायकल त्याच्या घराच्या परिसरात लपवून पळ काढला होता.

 

मात्र त्या ठिकाणाहून केज पोलिसांनी मोटारसायकल ताब्यात घेतली. परंतु सदरील आरोपी मांजरसुम्बा सोलापूर महामार्गावरील एका ढाब्यावर बसलेला असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन केज पोलिसांच्या हवाली केले. 
            दरम्यान सोनवणे यांची मोटारसायकल चोरणारा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र लातूर येथे कारागृहात असणारा व ह्या अल्पवयीन दुचाकी चोरांकडून इतरही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोना श्री.भोले हे करत आहेत.

Advertisement

Advertisement