Advertisement

 ९ वी अन् ११वीचे विद्यार्थीही परीक्षेविना जाणार पुढच्या वर्गात : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

प्रजापत्र | Wednesday, 07/04/2021
बातमी शेअर करा

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, परीक्षेविनाच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागानं दिलीय. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय. या आधी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशा सूचना होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा विचार करण्यात आलाय. आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केलं जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलाय.  

 

यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, याबाबत येत्या एक – दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही शिक्षण विभागानं सांगितलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली.

Advertisement

Advertisement