केज दि.३ - मुलाच्या पाठोपाठ त्याच्या विरहाने वृद्ध वडिलांनीही तिसऱ्याच दिवशी प्राण सोडल्याची दुःखद घटना केज तालुक्यात घडली आहे.
साळेगाव ता. केज येथील ऊसतोड मजूर वाल्मिक गालफाडे यांचे दि. ३१ मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारा दरम्यान स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रुग्णालयात निधन झाले होते. मुलगा वाल्मिकचे वडील नारायण गालफाडे हे मागील काही महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांची शुश्रूषा वाल्मिक गालफाडे करीत होते. त्यातच वाल्मिक गालफाडे यांना कोरोनाची लागण झाली व त्यांचे निधन झाल्याची माहिती त्याचे वडील नारायण गालफाडे यांना झाली. त्या विरहाने दि. ३ एप्रिल शनिवार रोजी सकाळी ९:०० वा. निधन झाले. नारायण गालफाडे हे सांप्रदायिक वृत्तीचे होते. त्यांच्या पश्चात विधवा सून, नातू, मुलगी व जावई असा परिवार आहे.
दरम्यान मागच्या पंधरा दिवसांत साळेगाव येथे वेगवेगळ्या कारणाने चौघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.