पाटोदा- धबधब्या वरून उडी मारून सौताडा येथील सतरा वर्षे युवतीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
सौताडा येथील शुभांगी लक्ष्मण शिंदे (वय वर्ष १७) ही दि.३१ मार्च रोजी रात्री नऊ वाजता गायब झाली होती. रात्री सर्वत्र शोधाशोध करूनही सदरील मुलगी सापडली नाही. आज सकाळी गावातील काही लोकांनी धबधब्याकडे पाहण्यास गेले असता सदरील युवतीचा मृतदेह पाण्यात पडलेल्या अवस्थेत दिसला.
यावेळी पोलिसांना माहिती देण्यात आली व पंचनामा करून मृतदेह पाटोदा येथील आरोग्य केंद्रामध्ये पीएमसाठी पाठवण्यात आला. सदरील आत्महत्या का केली याचे कारण मात्र अध्यापपर्यंत समजले नसून पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा