Advertisement

माजलगावात लाच घेणारा उपअभियंता गजाआड 

प्रजापत्र | Wednesday, 31/03/2021
बातमी शेअर करा

 माजलगाव-जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना एका रस्त्याच्या कामात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.३१) पकडले.ही कारवाई माजलगावमध्ये करण्यात आल्याची माहिती असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

 

                हिरामन गालफाडे असे त्या उपअभियंताचे नाव असून रस्त्याच्या कामाचे तीन लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रादाराकडून सहा हजारांची लाच स्विकरताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून सध्या बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून लाचखोरीचे अनेक गुन्हा उघडकीस आले आहेत.यात आता थेट उपअभियंत्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

Advertisement

Advertisement