Advertisement

जिल्ह्यात 32 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Monday, 27/07/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड तालुक्यातील 16, परळीतील 11, गेवराई तालुक्यातील 4 आणि शिरुरमधील  1 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी बीड जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या 32 ने वाढली आहे.
बीड शहरातील भगवानगर, कबाडगल्ली, बागवान गल्ली, झमझम कॉलनी, क्रांतीनगर, माळीवेस, चर्‍हाटारोड, यासह मांडवजाळी, काळेगाव हवेली आणि नेकनूर येथील रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर परळी तालुक्यातील पद्मावती गल्ली, माणिकनगर, आणि धर्मापूरी येथे पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेवराई शहरात मोटे गल्ली, गणेश नगर, निकम गल्ली, यासह रांजणीमध्ये तर शिरुर तालुक्यातील बोरगावमध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे.

 

Advertisement

Advertisement