पाटोदा - पाटोदा तालुक्यातील गारमाथा परिसरातील महेंद्रवाडी येथिल पाणंद विहीरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळल्याने वनविभाग खडबडुन जागा झाला आहे.
महेंद्रवाडी येथिल जुुण्या
विहीरीत हा तरुण बिबट्या मृत अवस्थेत आढळला .ग्रामस्थांनी पाहिला व दोरीने वर काढला. हे क्षेत्र मयुर अभयारण्यात येत असल्याने नायगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळवले आहे ते घटनास्थळी दाखल झाले असून तालुका पशुवैद्यकीय अधिकारी बळीराम राख यांना मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा