Advertisement

बायकोचा हात पकडला म्हणुन डॉक्टरच्या कानशीलात लगावली

प्रजापत्र | Monday, 22/03/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 
गेवराई दि २० ( वार्ताहार ) तालुक्यातील चंकलाबा याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका आरोग्य साहिका हिचा चक्क डॉक्टरानी हात पकडला तसेच  तिच्या पतीला याची खबर   लागल्यानंतर त्यांने डॉक्टरच्या कानशीलात लगावली असल्याची घटना तालुक्यातील चंकलाबा या ठिकाणी घडली .

 

   या बाबत अधीक माहिती अशी कि तालुक्यातील चंकलाबा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान डॉ.धनाजी बनसोडे यांनी आपल्याच कार्यलयात असना-या एका आरोग्य सेविका हिचा हात पकडला व सदरची घटना आपल्या पतीला सांगितली असता पती शंकर पाकलवाड यांना सांगितला असता त्यांना राग अनावर  न  झाल्याने त्यांने डॉक्टरच्या कानशीलात लगावली डॉक्टरवर विनयभंग तर सहायीका हिच्या पतीवर डॉक्टरांच्या फिर्यादीवरून गून्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रीया चंकलाबा पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती चंकलाबा पोलीसांनी दिली आहे .

Advertisement

Advertisement