Advertisement

 सुहास सिरसट यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार

प्रजापत्र | Sunday, 21/03/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.२१ मार्च - धारूरचा भुमिपूत्र चित्रपट अभिनेता सुहास सिरसट याला राज्यातील सन्मानाचा महाराष्ट्र  टाईम्सचा म.टा. सन्मान २०२१ चा सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार पांडू  या वेब सिरीज मधील पांडू या भुमिकेला मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. 

 

धारूर शहराचा भुमिपूत्र सुहास सिरसट याने मराठी चित्रपट सृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. येवढेच नाही तर सुहासने छोट्या पडद्यावरही मैदान गाजवले आहे. शहराचे वैभव असणाऱ्या अनेक चित्रपट व मालीका मधून राज्यभरात गाजलेल्या अभिनेता सुहास  सिरसट यांच्या कारकिर्दीस आणखी एक सन्मानाची भर पडली आहे.

सुहास सिरसट  यांचा म. टा.सन्मान २०२१ चा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार त्यांची वेबसिरीज पांडू मधील पांडूचे भुमिकेला मिळाला आहे. काल दि.२०मार्च रोजी मुंबई येथे  रोजी भव्य समारंभात सन्मान पुर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यात सन्मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांच्यावर अभिनंदन व कौतूकाचा वर्षाव होत आहे.

 

 

यापुर्वीही सुहास सिरसट यांना विविध पुरस्कार मिळवले आहेत. "भर दुपारी" या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. सिरसट यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या  "रात्रीस खेळ चाले" या मालिकेने भुमिकेनेही प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Advertisement

Advertisement