दिल्ली – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या लेटरबॉम्ब वर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत त्यांच्या राजीनाम्या बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अस सांगून परमवीर सिंग यांनी आजच हे पत्र का लिहिले असा सवाल केला .त्याचसोबत या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली .या प्रकरणाचा सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं .
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे सगळं प्रकरण गंभीर असल्याचं सांगत देशमुख किंवा मुख्यमंत्री यांनी सचिन वाझे यांची नियुक्ती केली नव्हती तर ती परमवीर सिंग यांनी केली होती अस म्हणत या दोघांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला आहे .
वाझे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला परत घेताना ती फाईल गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याकडे येत नाही अस सांगत देशमुख यांच्या राजीनाम्याची शक्यता मुख्यमंत्री यांच्यावर सोडली .पवार यांनी विरोधीपक्षासह इतरांनी केलेल्या मागणिबाबत ते त्यांचे काम आहे,आपण याबाबत काही बोलणार नाही अस म्हणत आज संध्याकाळी आपल्या पक्षाच्या काही सहकाऱ्यांशी आपण बोलणार असल्याचं सांगितलं .
पवार यांनी वाझे,परमवीर सिंग आणि अनिल देशमुख या प्रकरणात जी भूमिका घेतली आहे त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .