Advertisement

घरच्या मैदानात राजाभाऊंना धक्का, आंधळेंनी दिली मात

प्रजापत्र | Sunday, 21/03/2021
बातमी शेअर करा

बीडः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकिची मतमोजणी सुरु असुन  इतर शेती  मतदारसंघात  शेतकरी विकास पँनलचे अमोल आंधळे  हे २२३   मते घेत विक्रमी फरकाने म्हणजे २१२ मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी धनराज राजाभाऊ मुंडे यांचा पराभव केला. मुंडे यांना ९ मते मिळाली. हा मतदार संघ परंपरागत रित्या राजाभाऊ मुंडे यांचा मानला जातो. मात्र याच मतदार संघात त्यांच्या पुत्राला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 
या मतदारसंघात माजी मंत्री बदामराव पंडीत यांना केवळ  २  मतांवर समाधान मानावे लागले आहे.
जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान झाले होते, त्याची मतमोजणी रविवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. 

Advertisement

Advertisement