Advertisement

अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस तीन वर्ष कारावास

प्रजापत्र | Saturday, 20/03/2021
बातमी शेअर करा
बीड-केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील एका ४२ वर्षीय महिलेला तिच्या पतीने पैशांची मागणी करीत अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबाजोगाई अपर सत्र न्यायालयाचे न्या. एस.एस.सापटनेकर यांनी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व चार हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. 
      मनीषा गायकवाड या शिक्षिका असून त्या केजमध्ये राहतात.२८ सप्टेंबर २०१५ रोजी  त्यांचे पती श्रीधर पंढरी गायकवाड (वय-४२ रा.दहिफळ वडमाऊली) याने बियर शॉपी टाकण्यासाठी आपल्याकडे पत्नीकडे पैशांसाठी तगदा लावला.यावेळी मनीषा यांनी पैसे  देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.यावेळी पीडितेने तात्काळ घर सोडून केज पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.गाडेवाड यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस तीन वर्ष कारावास व चार हजार दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकारी पक्षाची बाजू आर.एम.ढोले यांनी मांडली. तर पैरवीचे कामकाज पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी यांनी पहिले.

Advertisement

Advertisement