Advertisement

परळीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तुफान राडा !

प्रजापत्र | Saturday, 20/03/2021
बातमी शेअर करा
 बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर आलेल्या मतदारांवरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले,यावेळी खुर्च्यांची फेकफेकी करत कार्यकर्त्यांनी राडा केला .
 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान सुरू होते,दुपारी चार वाजता मतदान संपले,मात्र तरीही परळीच्या औद्योगिक वसाहत केंद्रावर काही मतदार आले,त्यावर आक्षेप घेण्याच्या मुद्यावर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले .
 
यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण करत मोठा गोंधळ घातला,याची माहिती मिळताच माजीमंत्री पंकजा मुंडे या मतदान केंद्रावर पोहचल्या,त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गुंडशाही अन झुंडशाही चा निषेध केला .

Advertisement

Advertisement