Advertisement

 आर.एस.बेलगूडवार गेवराईचे नवे पोलीस निरीक्षक 

प्रजापत्र | Saturday, 20/03/2021
बातमी शेअर करा

गेवराई-गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुर्षोत्तम चौभे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.त्यांच्या जागी आर.एस.बेलगूडवार हे गेवराईचे नवीन पोलीस निरीक्षक असणार आहेत.शुक्रवारी (दि.१९) रात्री उशिरा पोलीस अधिक्षकांनी हे आदेश काढले.   

 

         गेवराई पोलीस ठाण्यात चौभे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. दोन दिवसापूर्वी एक जोडपे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते.मात्र पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी नव्हते.नंतर हे जोडपे घरी परतत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला चढविला.यात एकाची प्रकृती गंभीर असून सदर प्रकार सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी याची दखल घेत तात्काळ चौभे यांचा पदभार काढत त्याजागी आर.एस बेलगूडवार यांच्याकडे सोपविला.

 

Advertisement

Advertisement