Advertisement

बीड पोलिस पेट्रोलींगच्या  गाडीचा अपघात

प्रजापत्र | Wednesday, 17/03/2021
बातमी शेअर करा

बीड-   जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पेट्रोलिंगच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना बीड तालुक्यातील लोखंडा तलावाजवळील नगर रोडवर मंगळवारी मध्यरात्री घडली. यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

                                या अपघातामध्ये
 अशोक धांडे एपीआय (57), राजेंद्र शिंदे हेडकॉन्स्टेबल(55), प्रताप घोडके  पोलिस ड्रायव्हर वाहन चालक (47), 
उमा उद्धव माने (40) महिला, उद्धव, लक्ष्मण माने(50), तेजस मोरे(15), आनंद मोरे (25) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटना रात्री उशिरा घडली असल्याने या घटनेेची माहिती नितीन धांडे याांना
कळताच धांडे घटनास्थळी धाव घेतली व सहकाऱ्यांसह  अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेची माहिती
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गीते, सर्जन डॉ. सचीन देशमुख, डॉ. मजित सर तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स यांनी तातडीने उपचार केले.

Advertisement

Advertisement