Advertisement

विद्यापीठाला विद्यार्थ्यांची काळजी नाही का?

प्रजापत्र | Tuesday, 16/03/2021
बातमी शेअर करा

 बीड – एकीकडे राज्य सरकार कोरोनाचे कारण देऊन एमपीएससी च्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेत असताना दुसरीकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मात्र नियम पायदळी तुडवत आजपासून परीक्षा घेत आहे .या पदवी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी ही कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरू शकते .याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे .राज्यातील वाढता कोरोनाचा आलेख पाहता राज्य सरकारने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालत जमावबंदी लागू केली आहे .एवढेच नाही तर पाचवी ते नववी आणि अकरावी चे वर्ग 31 मार्च पर्यंत बंद ठेवले आहेत .दहावी आणि बारावीचे वर्ग केवळ सुरू आहेत .

 

राजकीय सभा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात बंदी घालण्यात आली आहे .एवढंच काय पण 14 मार्च ला होणाऱ्या एमपीएससी परीक्षा देखील सरकारने रद्द केल्या .गर्दीमुळे कोरोना झपाट्याने वाढतो आहे .हे एड्या गबाळ्याला कळतंय मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांना हे कळत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे .मराठवाड्यातील चार जिल्ह्यातील पदवी परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठाने दिले असून मंगळवार पासून या परीक्षा सकाळी आणि दुपारी अशा फोन सत्रात होणार आहेत .यासाठी प्रत्येक महाविद्यालयात किमान दोनशे ते पाचशे,सहाशे विद्यार्थी सकाळी आणि दुपारी एकत्र येत आहेत .

 

कोरोना फक्त एमपीएससी च्या परीक्षा सुरू असताना येतो अन इतर परीक्षांना येत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे .या परीक्षा घेण्यापेक्षा दुसरा काही पर्याय नाही का याचविचार यंत्रणेने करणे गरजेचे आहे .

Advertisement

Advertisement