Advertisement

'त्या' टोळीतील मुलीच्या 'मामाला' अटक

प्रजापत्र | Monday, 15/03/2021
बातमी शेअर करा

   
 आष्टी-तरुणांसोबत बनावट विवाह करून चार आठ दिवस राहून पैसे उखळणाऱ्या टोळीचा रविवारी (दि.१४) आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला होता.यावेळी दोघांना पोलिसांनी अटक केली होती.सोमवारी (दि.१५) याप्रकरणातील तिसरा आरोपी तथा लग्नात मुलीचा मामा म्हणून मिरवणाऱ्या इसमाला पोलिसांनी जामखेडमधून ताब्यात घेतले आहे. 
                आष्टी तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत दि.९ रोजी विवाह करुन एका महिलेने २ लाख रुपये दे अन्यथा मला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी मागणी करताच तरुणाने पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना रंगेनाथ पकडून टोळीचा पर्दाफाश केला आहे. प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते.त्या टोळीतील तिसऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी जामखेडमधून अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस  उपनिरीक्षक प्रमोद काळे, सहाय्यक फौजदार अरुण कांबळे ,बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर,प्रदिप पिंपळे,सचिन कोळेकर,स्वाती मुंडे,शिवप्रकाश तवले,पो.कॉ.रियाज पठाण यांनी केली.दरम्यान तीनही आरोपींना न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Advertisement