Advertisement

आष्टीत २४ तासात दोन घरफोड्या

प्रजापत्र | Monday, 15/03/2021
बातमी शेअर करा

आष्टी-शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून २४ तासात दोन ठिकाणी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत.यात सव्वा तीन लाखांचा हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला असून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
        शहरातील सायकड गल्लीतील आर.सी.खुळपे या शिक्षकाच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरटयांनी घराचे कुलूप तोडून तीन तोळे सोने व नगदी १० हजार असा १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.तर दुसरी घटना शहरातील मुर्शदपूर भागात घडली.प्रा.नवनाथ विधाते यांच्या घरातील सर्व सदस्य सोमवारी (दि.१५) आपल्या मुळ गावी नांदूर विठ्ठल येथे गेले होते.दुपारी पावणे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील १ लाख ४० हजार रोख रक्कम व एक तोळ्याची सोन्याची चैन असा पावणे दोन लाखांच्या आसपास लाखांचा ऐवज लंपास केला.या दोन्ही घटनेत सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला असून २४ तासात घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत.दरम्यान दोन्ही घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे,पो.ना.मच्छिंद्र उबाळे,अमोल ढवळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

 

'मी जादूगर अथवा शक्तिमान नाही' 
दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी भेट दिल्यानंतर फिर्यादींनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.यावेळी काळे यांनी फिर्यादींना' मी जादूगर अथवा शक्तिमान नाही.तुम्हाला तुमच्या घराची योग्य काळजी घेता येत नाही का ?' असा सवाल उपस्थिती केला होता.

Advertisement

Advertisement