Advertisement

लसीचा दुसरा डोस घेऊनही डॉक्टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Monday, 15/03/2021
बातमी शेअर करा

बीड-सध्या जिल्हयात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरु असून  लसीचे दोनही डोस घेतल्यानंतर डॉक्टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.दरम्यान लस घेतल्यानंतरही मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे पालन गरजेचे आहे, हे यावरून स्पष्ट होते. 

      जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली.लस घेतल्यावर कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा सर्वांच्या मनात गैरसमज होता. लस घेतल्यावरही काळजी घ्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात आले, परंतु अनेकांनी काळजी घेतली नाही.दरम्यान, जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने इतरांना लस घेण्याचे आवाहन करण्यासह स्वता: पुढे होऊन लस घेतली.

 

पहिला डोस पहिल्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारी आणि दुसरा डोस १६ फेब्रुवारीला घेतला. परंतु रविवारी थोडा ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या डॉक्टरसह जिल्हा रूग्णालयातील परिचारीका आणि एक आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लस घेतली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही बाधित आलेल्या डॉक्टरने केले आहे

Advertisement

Advertisement