Advertisement

वादग्रस्त वाझे यांना 10 दिवसांची कोठडी !

प्रजापत्र | Sunday, 14/03/2021
बातमी शेअर करा

 मुंबई – मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा मार्ग मोकळा झाला आहे.वाझे यांच्या काही सहकारी पोलिसांची देखील चौकशी सुरू असून यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे .या प्रकरणात वाझे यांच्या पाठिशी शिवसेनेचा ठाण्यातील एक आमदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे .

‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची 14 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी शनिवारी NIA ने सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली होती

आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

तर दुसरीकडे एनआयएच्या कार्यालयात सचिन वाझे यांचे सहकारी असलेल्या CIU युनिटमधील चार अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. यापैकी वाझेंचे सहकारी रियाझ काझी यांची पाच तासांपेक्षा अधिक काळापासून चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता एनआयए आता आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेणार का, हे पाहावे लागेल.

Advertisement

Advertisement