Advertisement

२५लाखाची लॉटरी लागल्याचे भासवून लाख रुपये लाटले!

प्रजापत्र | Sunday, 14/03/2021
बातमी शेअर करा

बीड- 'केबीसी' ची २५ लाखांची लॉटरी लागल्याचे भासवून भामट्यांनि बीडच्या तरुणाला १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. 
मागील आढवड्यात फसवणुकीचा हा प्रकार घडला. 
भामट्यांनि सध्या केबीसीच्या नावे एसएमएस आणि कॉल करून फसवणुकीची नवी पध्द्त अवलंबविली आहे. रोहित प्रकाश राठोड (रा. जोडतांडा, माजलगाव ह.मु शाहूनगर, बीड)या १८ वर्षीय तरुणाला (दि.१०) रात्री अज्ञात भामट्यांने कॉल करून केबीसीचा मॅनेजर असल्याची बतावणी केली आणि तुम्हाला २५लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. रोहितकडून विविध कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. त्यानंतर जीएसटी, तिकीट, खाते काढणे अशी विविध करणे सांगून रोहितकडून १ लाख१२ हजार५०० रुपये उकळण्यात आले आणि सोमवारी खात्यावर लॉटरीचे पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानंतर भामट्यांनि फोन रिसिव्ह करणे बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे  रोहितच्या लक्षात आले. याप्रकरणी रोहितच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Advertisement

Advertisement