Advertisement

आज शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा

प्रजापत्र | Wednesday, 10/03/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.10 -  राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांंनी नियमीतपणे कर्जफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ही मदत करणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवारांनी याबाबत विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे.

                शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे. सरकार मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचं पीककर्ज बिनव्याजी देण्याचीही घोषणा अजित पवारांनी सभागृहात केली आहे.

Advertisement

Advertisement