Advertisement

किसानसभेने केले मोफत भाजीपाला वाटप 

प्रजापत्र | Wednesday, 10/03/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.१० (वार्ताहर) बीड जिल्ह्यात आठवडी बाजार बंद केल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लुट व नुकसान टाळण्यासाठी किसानसभेच्या वतीने शेतकऱ्यांचा भाजीपाला मोफत वाटप करण्यात आले व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत भाजीपाला विक्रीची सोय करण्याची मागणी तहसीलदारकडे  करण्यात आली आहे. 
                
कोरोना चा प्रादूर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात आठवडी बाजार बंद करण्याचा व सार्वजनीक कार्यक्रम बंदीचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. या आदेशा मुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. मेहनत करून खर्च करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागत आहे. नसता तोडून टाकावा लागत आहे. यामुळे शेतकरी गतवर्षी प्रमाणेच पुन्हा अडचणीत आला आहे. या सर्व बाबी मुळे किसानसभेच्या वतीने शेतकऱ्याची होणारी लुट व नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री साठी सुविधा करावी अशी मागणी किसानसभेच्या वतीने करत शेतकऱ्यांचे मेथी, शेवगा शेंग यांचे प्रतिकात्मक धारूर बसस्थानका समोर मोफत वाटण्यात आले. नागरीकाना मोफत भाजीपाला वितरीत करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी किसानसभेचे मोहन लांब, काशीराम सिरसट, संजय चोले, डॉ. अशोक थोरात आदी शेतकरी उपस्थित  होते. तहसीलदारला या संदर्भात किसानसभेच्या वतीने निवेदन देण्यात आले. कोरोना मुळे शेतकरी संकटात आहे गतवर्षी या काळातच लॉकडाऊन झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांन मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागला व खर्च हि निघाला नाही. यावर्षी पुन्हा आठवडी बाजार बंद करून भाजीपाला विक्री हि बसून करून दिली जात नाही. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांचे भाजीपाला विक्री साठी प्रशासनाने नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे किसान सभेने केलेले मोफत वाटप हा आज चर्चेचा मुद्दा ठरला.
 

Advertisement

Advertisement