Advertisement

राज्यात ५०० आदर्श शाळा स्थापित करणार – वर्षा गायकवाड

प्रजापत्र | Sunday, 07/03/2021
बातमी शेअर करा

मुंबई | राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकार शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी कटिबद्ध आहे. ५०० आदर्श शाळा स्थापित करणे हे त्या दिशेनं टाकलेले पाऊल असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन दिला गेला असला. तर विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय महत्वाचा म्हणावा लागेल.

“शासकीय शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ५०० आदर्श शाळा स्थापित करणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडेल,यासाठी शाळांत नियमित शिक्षणाव्यतिरिक्त मानसिक,शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल असे शिक्षण दिले जाईल”, असं ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. “सदर आदर्श शाळांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, आदर्श शिक्षक-विद्यार्थी संख्येनुसार सोयीसुविधांचा वापर, निकाल आणि परिणामांवर भर दिला जाईल”, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement