Advertisement

राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

प्रजापत्र | Sunday, 07/03/2021
बातमी शेअर करा

औरंगाबाद दि.७ - मागच्या कांही दिवसांपासून राज्यात कोरोना पुन्हा बळावत आहे. दिवसेंदिवस संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रूग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. खबरदारी म्हणून संचारबंदीचे आदेश देत शाळाही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना मास्कचा वापर करत वारंवार आपले हात सॅनिटाइज करण्यास सांगितले आहेत. तर दुसरीकडे याच्या उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालण्याचं आवाहन करत आहेत.

                   राज ठाकरेंच्या आवाहनामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार झाली आहे. औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, असा तर्क लावत वकील रत्नाकर चौरे यांनी तक्रार दाखल केली आहे.

          मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असतानाही त्यांनी मास्क घातलं नव्हतं. त्यावेळी तर त्यांनी  नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढण्यास सांगितलं. तर त्याआधी मराठी भाषा दिनाच्या वेळी मनसेने मराठी स्वाक्षरी मेहिम राबवली होती. त्यावेळी शिवाजी मैदानावर पत्रकारांशी संवाद साधाताना त्यांनी मी मास्क घालत नाही, असं जाहीरपणे सांगितलं होतं.

Advertisement

Advertisement