कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मागच्या सात दिवसांपूर्वी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती, ही संचारबंदी उद्यापासून उठणार आहे. परंतु, तरीही रुग्ण संख्या कमी न झाल्याने रात्रीची संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवली आहे. दिवसा जरी बाजारपेठ खुली करण्यात येत असली तरी रात्री 7 ते सकाळी सातपर्यंत सर्व प्रकारची बाजारपेठ बंदच राहणार आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने सुरू करताना आपण निगेटिव असल्याचे प्रमाणपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर हॉटेल, बार, शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळ बंद राहणार आहेत. केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना पार्सल देण्याची मुभा असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज याबाबत आज आदेश काढले आहेत. त्याचबरोबर सर्वांना कोरोना बाबतचे नियम पाळण्याचे आवाहनही केले आहे.