CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये काही विषयांच्या पेपरच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सीबीएसईच्या वेबसाईटवर परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार १०वीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या पेपरच्या तारखा बदलून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यासोबतच १२वीच्या फिजिक्स, इतिहास आणि बँकिंग या विषयांच्या पेपरच्या तारखा देखील बदलण्यात आल्या आहेत. बदललेल्या तारखांचं नवीन वेळापत्रत सीबीएसईच्या cbse.nic.in या संकेतस्थावर देखील देण्यात आलं आहे.
काय आहेत बदल?
नव्या वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाचा १०वीचा विज्ञान विषयाचा पेपर २१ मे रोजी घेण्यात येणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार या दिवशी गणिताचा पेपर होता. गणित विषयाचा पेपर २ जून रोजी घेण्यात येणार आहे. सीबीएसई १२वीच्या परीक्षांमध्ये फिजिक्स विषयाचा पेपर ८ जून रोजी घेण्यात येणार आहे. बँकिंगचा पेपर ९ जून रोजी तर इतिहासाचा पेपर १० जून रोजी घेण्यात येणार आहे.