Advertisement

हनुमान महाराजांच्या अटकपूर्व जामिनाचं काय झालं?

प्रजापत्र | Thursday, 04/03/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले
गेवराई दि ४-बाल लैंगिक अत्याचार तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी  कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी अटकपुर्व जामिनचा अर्ज बीडच्या जिल्हा व सत्र  न्यायलयाने फेटाळला आहे. यामुळे महंतांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक दिवसांपासून महंत पोलिसांना गुंगारा देत आहेत.
        सुर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड झाल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.माझ्या मृत्युला गावातील काही राजकीय व्यक्ती,पत्रकार,पीडित कुटूंब जबाबदार आहे अवघ्या पाच मिनिटात मी गळफास लावणार असल्याचा व्हिडीओ व्हॉयरल करून हनुमान महाराज गिरी हे पसार झाले.मात्र सलग तीन दिवस पोलीस प्रशासन त्यांना शोधत होते .
  महारांजाच्या नातेवाईकांकडून  हनुमान महाराज जिवंत असल्याची पुष्टी पोलीसांना झाल्यानंतर त्यांनी शोध मोहिम थांबवली परंतू पोलिसांनी गुंगारा देणारा हनुमान महाराज गिरी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.हनुमान महाराज गिरी यांनी मागील आठवड्यात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी झाली, मात्र न्यायालयाने हनुमान महाराज गिरी यांना अटकपूर्व जमीन द्यायला नकार दिला त्यामुळे आता महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.आता त्यांना कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते  .

 

Advertisement

Advertisement