Advertisement

  खाद्यतेलांच्या दरवाढीचा भडका          

प्रजापत्र | Thursday, 04/03/2021
बातमी शेअर करा

बीड दि.३ (प्रतिनिधी)-देशात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे महागले असताना आता रोज जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे वस्तूंचे दर दिवसेंदिवस महाग होत चालले असून खाद्यतेलांच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र आहे.आज शेंगदाणा, सोयाबिन, सूर्यफूल,पामतेलांचे भाव पुन्हा डब्ब्यामागे १०० ते १२० रुपयांनी वाढले असून डाळीही तेजीत आल्या आहेत.
              पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढतो. परिणाम वस्तूंच्या दरांमध्ये वाढ केली जाते.राज्यात मागचे पाच दिवस वगळले तर रोज इंधनाचे दर सातत्याने वाढत होते.आज बीडमध्ये पेट्रोल ९८.४४ च्या घरात गेले असून मागील पाच दिवसात इंधनाचे दर स्थिर झाल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते.मात्र आता खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे.या दरवाढीमागे वाहतूक खर्च आणि उत्पादन घटणे ही दोन प्रमुख करणे व्यापाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येतात.आज खाद्यतेलाच्या दर लिटर मागे १० रुपयांनी वाढले असून डाळींचे भाव पाच रुपयांनी महागले आहेत.मागील महिन्यात तेलांचे दर वाढले होते.आता पुन्हा एकदा डब्यामागे १०० ते १२० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे.

 
महिनाभरात पाच रुपयांनी घटले नंतर २० रुपयांनी महागले
खाद्य तेलांच्या दरांमध्ये १ फेब्रुवारीला पाच रुपयांची घट झाली होती.नंतर १० फेब्रुवारीला पुन्हा तेलांचे दर लिटर मागे १० रुपयांनी वाढले.नंतर पुन्हा १ मार्चला या दरांमध्ये १० रुपयांची वाढ झाली असून महिनाभरात तेल लिटरमागे २० रुपयांनी वाढले आहे.

 
डाळीही शंभरी पार
हरभरा डाळ वगळली तर मूग,तूर डाळ आज शंभरी पार गेल्या आहेत.बाजारात आज हरभरा डाळ ५५ ते ६० रुपयांच्या घरात किलोमागे गेली असून मूग डाळ १०० ते ११० तर तूर डाळ देखील याच दरांमध्ये विक्रीसाठी उपल्बध आहे.सर्व डाळींमध्ये किलोमागे ५ रुपयांची वाढ झाली आहे.

Advertisement

Advertisement