Advertisement

सीम कार्ड बंद पडणार म्हणत शिक्षिकेला लाखाला गंडविले

प्रजापत्र | Wednesday, 03/03/2021
बातमी शेअर करा

    
बीड दि.३ (प्रतिनिधी)-तुमचे बीएसएनएलचे सीम कार्ड बंद पडणार आहे, मी तुम्हाला एक लिंक टाकतो, ते ऍप डाऊनलोड करा आणि मला ११ रुपये पाठवा, त्यानंतर तुमचे कार्ड सुरू होईल, असे म्हणत भामट्याने एकाला १ लाख ४ हजार ४९३ रुपयांना फसवल्याचा प्रकार काल परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                सुमेदा दयानंद हाबूब (वय ५० वर्षे, रा. पोडा गोवा ह.मु.सरकारवाडा, अंबावेस परळी) या शिक्षिकेला काल ७०७४८७१५२१ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला की, तुमचे बीएसएनएल कार्ड डी ऍक्टिवेट होणार आहे. ते सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला एक ऍप डाऊनलोड करावे लागेल असे म्हणून त्या भामट्याने त्यांना एक लिंक पाठविली त्यानंतर त्याने त्यांच्या मोबाईलवरून डेबिट कार्डद्वारे ११ रुपये पाठविण्यास सांगितले. शिक्षिकेने त्यांना दोन वेळेस ११ रुपये सेंट केल्यानंतर त्यांच्या कार्डमधून टप्प्या टप्प्याने १० हजार, २० हजार, २० हजार ४७२, ३० हजार रुपये, १२ हजार ९९९ रुपये नंतर १० हजार रुपये, ५०० आणि त्यानंतर ५ हजार रुपये असे एकूण १ लाख ४ हजार ४९३ रुपये खात्यातून कपात झाल्याचा मॅसेज त्यांच्या मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजताच तात्काळ ते डेबिटकार्ड ब्लॉक केले व परळी शहर ठाण्यात जावून फसवणुकीची तक्रार दिली. या प्रकरणी मोबाईल क्र. ७०७४८७१५२१ या क्रमांकाच्या मोबाईल धारकावर परळी शहर पोलिस ठाण्यात कलम ४२०, ६७ (क) माहिती तंज्ञान अधिनियम २००८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कदम हे करत आहेत.

Advertisement

Advertisement