Advertisement

पतीच्या खून प्रकरणी पत्नीला पोलिस कोठडी

प्रजापत्र | Tuesday, 02/03/2021
बातमी शेअर करा

 

अविनाश इंगावले 
गेवराई दि २ ( वार्ताहार ) गेल्या आठवडा भरापुर्वी संगम जळगाव याठिकाणी आपल्याच शेतात मृत अवस्तेथ एकजन आढळून आला होता तसेच या प्रकरणी बीट आमलदार यांनी फिर्याद दिली होती पत्नीनेच पतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .

    या बाबद मिळालेली माहिती अशी कि , राजकूमार अश्रूबा बडे वय ५१ वर्ष राहनार संगम जळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड असे मयताचे नाव असुन ह्या ईसमाचा आपल्याच शेतात मृत्यूदेह आढळला होता नातेवाईकांनी या प्रकरणी फिर्याद देण्यास नकार दिला होता . परंतू पोलीसांनी मयताचा वैद्यकीय अहवाल मागवला असता गळा आवळल्याने गूदमरून मृत्यु झाला असल्याचा अंदाज डॉक्टरानी वर्तवल्यानंतर बीट आमलदार विठ्ठल देशमुख यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गूरनं ७३ /२०२१ कलम ३०२ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला होता .

   तपासा दरम्यान सगळी माहिती व पुरावे यांच्या आधारावर आपल्याच पतीचा खुन पत्नी मिराबाई राजकुमार बडे यांनी केला असल्याच्या संशयावरून तपास अधीकारी  यांनी अटक करून न्यायलयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधीकारी प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे .

Advertisement

Advertisement