Advertisement

लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठी लाचलुचपत जाळ्यात

प्रजापत्र | Tuesday, 02/03/2021
बातमी शेअर करा

आष्टी दि.२ ( प्रतिनिधी)  अनुदान व कुटूंब शेत वाटप पत्रासाठी ४५०० हजाराची मागणी करून तडजोड करून ३००० मागितल्या प्रकरणी मोराळा सज्जाचे तलाठी बाळासाहेब बनगे यांना लाच लुचपत विभाग बीड यांच्या पथकाने मंगळवार दि.२ मार्च या दिवशी दुपारी १ वाजता शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आष्टी येथील तलाठी कार्यालयात कारवाई करून पकडले. 
याबाबत माहिती अशी की,मोराळा येथील शेतकऱ्यांला मोराळा सज्जाचे तलाठी बाळासाहेब महादेव बनगे यांनी अनुदान मिळून देतो व कुटूंबातील आई,वडील,भाऊ,बहीण यांच्या नावे शेती वाटप पत्रासाठी ४५०० मागणी केली होती. तडजोड करून ३००० स्वीकारण्याचे ठरल्यानंतर दि. २९ रोजी मंगळवार दुपारी १ वाजता तलाठी कार्यालयात बीड लाचलुचपतच्या पथकाने कारवाई करून लाच मागणी केल्या प्रकरणी पकडले. ही कारवाई लाचलुचपत बीड विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील 
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी यांनी तसेच पो.ना श्रीराम गिराम, पो. शि. संतोष मोरे,पो. शि.भारत गारदे या पथकाने केली आहे.या प्रकरणी आरोपींच्या विरोधात आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होण्याची प्रकिया चालू आहे.
आष्टी तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सज्जा वर अशी देवाण-घेवाणीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात कायम सुरू असते.या अगोदर लाचलुचपत विभागाने अनेक कारवाई केल्या आहेत मात्र ,तरी देखील कायमच असे प्रकार वारंवार घडत आहेत . मात्र या कारवाईमुळे तहसिल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

Advertisement