Advertisement

आज अंबाजोगाईत सर्वाधिक पॉझिटिव्ह 

प्रजापत्र | Sunday, 28/02/2021
बातमी शेअर करा

बीड- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण काहीसे वाढले असून मागील आठवड्याभरपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अर्धशतकच्या जवळ पास सापडत आहे.रविवारी (दि.२८) जिल्ह्यामध्ये ४३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यात सर्वाधिक पॉझिटिव्ह अंबाजोगाईमधील आहेत. 
              बीड जिल्ह्यातील ११९२ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या.त्यापैकी ४३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून तब्ब्ल ११४९ जण निगेटिव्ह आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १०, आष्टी ३,बीड ९, धारूर १, गेवराई ६,केज २, माजलगाव ७,परळी ४, पाटोदा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

Advertisement

Advertisement