मुंबई-निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असून पाच राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात येत आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे.“एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत” अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल.पहिल्या फेजमध्ये २७ मार्चला, त्यानंतर एक एप्रिल आणि सहा एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल.
राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आठ फेजमध्ये मतदान होणार आहे.
पुदुचेरीमध्ये ३० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून १९ मार्चला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल. अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल मतमोजणी – दोन मे
केरळचा निवडणूक कार्यक्रम (१४० जागा) असणार आहे. अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च. केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल मतमोजणी – दोन मे ला होणार आहे.दरम्यान पाच ही राज्यातील निवडणुकीचा निकाल २ मे ला लागणार आहे.
बातमी शेअर करा