Advertisement

अंबानी यांना भारत सरकारकडून z + सुरक्षा 

प्रजापत्र | Friday, 26/02/2021
बातमी शेअर करा

मुंबई - 71.2 बिलियन डॉलर्सच्या मालमत्तेचे मालक मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अंबानी यांना भारत सरकारकडून z + सुरक्षा मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार मुकेश यांचे सुरक्षारक्षक असलेले पोलिस बुलेटप्रुफ बीएमडब्ल्यू, रेंजरोव्हर सारख्या वाहनांमधून येत असतात. रिपोर्ट्सनुसार मुकेश यांच्या ताफ्यात पांढर्‍या मर्सिडीजची AMG G63 मॉडेल कारचा समावेश असतो. मुकेश अंबानी हे देशातील एकमेव उद्योगपती आहेत ज्यांना 'Z' प्लस सुरक्षा मिळाली आहे.

सुरक्षेसाठी 20 लाख रुपये खर्च
अंबानी आपल्या सुरक्षेचा संपूर्ण खर्च स्वतः उचलतात. रिपोर्ट्सनुसार मुकेश अंबानी त्यांच्या सुरक्षेसाठी दरमहा सुमारे 20 लाख रुपये खर्च करतात . 

55 सुरक्षारक्षक नेहमी मुकेश अंबानी यांचे रक्षण करतात
Z+ सुरक्षा असल्याने मुकेश अंबानीच्या सुरक्षे वेळी एकाच वेळी 55 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यामध्ये 10 एनएसजी आणि एसपीजी कमांडो आहेत आणि बाकीचे पोलिस पथकातील आहेत. पहिल्या फेरीच्या सुरक्षेसाठी जबाबदारी एनएसजीची असते तर दुसऱ्या लेअरमध्ये एसपीजीचे लोक असतात. याशिवाय आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवानही सुरक्षेत तैनात आहेत. एसपीजी कमांडो सहसा झेड प्लस प्रकारातील संरक्षणाखाली पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांना सुरक्षा कवच पुरवतात.