Advertisement

फेब्रुवारी महिन्यात तिसर्‍यांदा वाढले सिलेंडरचे दर

प्रजापत्र | Thursday, 25/02/2021
बातमी शेअर करा

बीड-कोरोना महामारीनंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे आता गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.याआधी ४ फेब्रुवारी आणि त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी सिलेंडरचे दर वाढले होते. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण असून बीडमध्ये विना अनुदानित सिलेंडर ८२० रूपयांना झाले आहे. 
      फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर ४ फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ झाली होती. त्या नंतर १५ फेब्रुवारी रोजी ५० रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपायांची वाढ करण्यात आली आहे.

 

Advertisement

Advertisement