कर्जत – थोड्या प्रमाणात कर्णबधिर असलेल्या मुलाची समाजाकडून होणारी हेळसांड सहन न झाल्यामुळे डॉक्टर ने आपल्या दोन मुलांसह पत्नीला इंजेक्शन देत स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राशीन येथे उघडकीस आली आहे .या घटनेमुळे खळबळ उडाली आहे .आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत डॉक्टर महेंद्र थोरात (वय ४६) यांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे .
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉक्टर थोरात यांनी म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा (वय १८) कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे.अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे आम्ही वडील व आई म्हणून दुख: सहन करू शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा (वय ३९) आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हे योग्य नसले तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहे. यात कोणालाही जबाबदार धरू नये असा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे. तर कैवल्य आठ वषार्चा आहे.
डॉ थोरात यांचा मुलगा कृष्णा हा क्रिकेट खेळाडू होता. त्याला पुण्यातील एका क्रीडा संस्थेत शिक्षणासाठी पाठविले होते. त्याला ऐकू यावे, यासाठी बरेच उपचार केला. मात्र, त्यात यश येत नव्हते. त्याला श्रवण यंत्रही घेऊन देण्यात आले होते. त्याचाही उपयोग होत नव्हता. डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी आहेत. राशीनमध्ये येऊन त्यांनी हॉस्पिटल सुरू केले. ते चांगले चालत होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे स्नेहबंध वाढले होते. मात्र अचानक त्यांनी हे पाऊल उचलल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.