बीड : दिल्लीमध्ये टूल किट प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेल्या बीड येथील शंतनू मुळूक या पर्यावरणवादी कार्यकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरांगाबाद खंडपीठाने १० दिवसांचा दिलासा दिला आहे. न्या. विभा कणकणवाडी यांनी मुळूक यांच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली येथील नायालयात हजर होऊन दाद मागण्यासाठी शंतनू याला १० दिवसाचा ट्रान्झिट जमीन मंजूर केला.
दिल्ली पोलिसांनी कथित टूल किट प्रकरणात गुन्हे दाखल केल्यानंतर दिशा रवी या तरुणीला अटक केली होती तर निशा जॅकोब आणि शंतनू मुळूक यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जरी केले होते. यावर शंतनू मुळूक यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरन्गाबाद खंडपीठात ट्रान्झिट जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. याची सुनावणी न्या. विभा कंकणवाडी यांच्यासमोर झाली. यात न्यायालयाने शंतनू यांना १० दिवसांचा जमीन मंजूर केला आहे. शंतनू मुळूक मूळचा बीडचा असून पर्यावरणवादी कार्यकर्ता आहे.