Advertisement

 वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई 

प्रजापत्र | Tuesday, 08/09/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.८(प्रतिनिधी):तालुक्यातील सुरळेगाव नदीपात्रातुन विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवार (दि.८) रोजी कारवाई केली असून चार ट्रॅक्टर व चार लोखंडी केन्या असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
   बीड जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा चालू आहे.त्यातच गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदावरी नदीपात्रात काही जण आर्थिक फायद्यासाठी ट्रॅक्टरला लोखंडी केन्या लावून विनापरवाना वाळू उपसा करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीची खात्री करून पथकाने नदीपात्रात मंगळवार (दि.८) रोजी कारवाई केली. यावेळी सोमनाथ शिवाजी मोरे (वय २७), आदेश ज्ञानेश्वर भंडारे (वय २१), सचिन भाऊराव लिबोरे (वय २४), विकास अनित तोतरे (वय २५) हे वाळू उपसा करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून चार ट्रॅक्टर आणि चार लोखंडी केन्या असा ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी चौघांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.व्यंकटराम, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्रीराम खटावकर, पोह.अर्जुन यादव,पो.अं बबन सलगर, मनोज परजणे, अश्पाक सय्यद व नितीन वडमारे यांनी केली.

 

Advertisement

Advertisement