Advertisement

आंतरवलीत आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 03/09/2026
बातमी शेअर करा

 धारूर दि.३(प्रतिनिधी): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवली सराटी येथे गेलेल्या धारूर तालुक्यातील संगम येथील दशरथ शिवाजी रायकर (वय ४०)  या आंदोलकाचा  गुरुवार (दि. ३) रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने संगम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    दशरथ रायकर हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवली सराटी येथे गेले होते.गुरुवारी पहाटे तीन ते सहा वाजण्याच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय,अंबड येथे पाठविण्यात आले आहे. त्यांच्या मृत्युचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.रायकर यांच्या निधनाची बातमी समजताच संगम गावासह धारूर तालुक्यात शोककळा पसरली.आंदोलनासाठी गेलेल्या एका बांधवाचा मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेमुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य कुटुंबांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. रायकर यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement