बीड-विधानसभा निवडणुकीआधी आसाममध्ये पेट्रोल,डिझेल आणि दारू स्वस्त झाली आहे.देशात सातत्याने इंधनाचे दर वाढ असताना आसाममध्ये पेट्रोल-डिझेल पाच रुपये स्वस्त झाले .तर दुसरीकडे दारूवरील करात २५ टक्क्यांची भरघोस कपात करण्यात आली आहे.
आसामचे वित्तमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना ही माहिती दिली.कोरोनाकाळात पेट्रोल,डिझेल आणि दारूवर अतिरिक्त सेस (उपकर) लावण्यात आला होता.मात्र आता रुग्णसंख्या घटली आहे.यामुळे कॅबिनेटने अतिरिक्त सेस हटविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान आसाममध्ये १२६ सदस्यीय विधानसभेसाठी येत्या मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बातमी शेअर करा