Advertisement

 केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

प्रजापत्र | Saturday, 25/07/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीत गेल्या एका महिन्यापासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. याच मुद्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र, २३ जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. असं असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

Advertisement

Advertisement