बीड दि.२४(प्रतिनिधी):शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात आज दुपारी एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
प्रकल्पाच्या काठावर मोटारसायकल, चप्पल आढळून आल्याने सकाळपासूनच नातेवाईकांनी त्याठिकाणी गर्दी केली होती. अग्निशामक दलाचे कर्मचारी, पोलीस देखील घटनास्थळी थांबून होते. सकाळपासून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. अखेर दुपारी मृतदेह शोधण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. सदरील मृतदेहाची ओळख पटली असुन हमीद बागवान (वय ४०) रा.मोमीनपुरा, बीड असे मयताचे नाव आहे. कर्करोगाच्या आजाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
बातमी शेअर करा

