शिरूर कासार दि.२३(प्रतिनिधी):तालुक्यातील हिवरसिंगा येथील एका शेतकऱ्याच्या घराला आग लागून घरातील टीव्ही,शेतीचे अवजारे,धान्य,कपडे, कागदपत्रे इत्यादी साहित्य जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील गोरख शिंदे या शेतकऱ्याच्या घराला गुरुवार (दि.२३) रोजी घरासमोर असलेल्या चुलीमुळे आग लागून घरातील टीव्ही,बॅटरी,इन्व्हटर,लाईट फिटींगचे साहित्य,दोन बाजा,धान्य, कपडे, कागदपत्रे शेतीचे साहित्य तसेच घरामधील इतर साहित्य व ३५ हजार रोख रक्कम असा एकूण दिड लाख रुपयांचा मुद्देमाल या आगीत जळून खाक झाला असून गावातील लोक मदतीसाठी धावून आले आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.आगीतून झालेल्या नुकसानीमुळे शिंदे कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. प्रशासनाने सदरील घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

